संकट काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्या-पालकमंत्री पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:17+5:302021-05-27T04:32:17+5:30

बैठकीस खासदार डॉ. हीना गावीत, जि.प. अध्यक्ष सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ ...

Provide employment to the citizens in times of crisis - Guardian Minister Padvi | संकट काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्या-पालकमंत्री पाडवी

संकट काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्या-पालकमंत्री पाडवी

बैठकीस खासदार डॉ. हीना गावीत, जि.प. अध्यक्ष सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे उपस्थित होते. बैठकीत पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी सांगितले की, मनरेगाच्या माध्यमातून फळबाग लागवडीच्या कामाला गती द्यावी. आदिवासी माणसाला सक्षम करण्यासाठी फळबाग योजनेची माहिती दुर्गम भागातील शेतकऱ्यांना देण्यात यावी. बांधावर फळझाडे लावण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात यावे. या योजनेचा लाभ स्थलांतर रोखण्यासाठी होऊ शकेल. बहुतांशी आदिवासी माणसाचे उत्पन्न निसर्गावर अवलंबून आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे आणि या गाळाचा उपयोग शेतीसाठी करण्यात यावा. नवीन पाझर तलावांच्या नव्या कामांचे नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावी. ‘ब्रीज कम बंधारा’ उपयुक्त ठरत असल्याने त्याचेही नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी शेवटी केल्या. बैठकीस कृषी, सामाजिक वनीकरण, वन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Provide employment to the citizens in times of crisis - Guardian Minister Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.