कामबंदला बगल देत प्राध्यापकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:51 IST2018-10-07T12:51:08+5:302018-10-07T12:51:12+5:30

The protest movement of the professors, beside the work force | कामबंदला बगल देत प्राध्यापकांचे ठिय्या आंदोलन

कामबंदला बगल देत प्राध्यापकांचे ठिय्या आंदोलन

नंदुरबार : विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्राध्यापक संघटनांकडून कामबंद आंदोलनाला बगल देत महाविद्यालयीन सर्व कामे करुन झाल्यावर  त्या-त्या महाविद्यालयात ठिय्या आंदोलनात सहभाग घेण्यात येत आह़े 
विविध 15 मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनांतर्फे गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेले आह़े परंतु सध्या विविध प्रॅक्टीकल व सेमीस्टर परीक्षा असल्याने यातून विद्याथ्र्याचे नुकसान होत असल्याचे ओळखत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत असलेल्या प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आह़े त्या ऐवजी प्राध्यापकांकडून संपूर्ण महाविद्यालयीन काम आटोपून त्या-त्या महाविद्यालयात ठिया आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती एऩ मुक्टोचे जिल्हाध्यक्ष डॉ़ सी़पी़ सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न वाढला आह़े नेट-सेटच्या माध्यमातून प्राध्यापकाच्या नोकरीसाठी विद्यार्थी प्रयत्नशिल असतात़ मात्र, प्राध्यापकांची भरती प्रक्रिया होत नसल्याने नेट-सेट परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्र्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने विद्याथ्र्याकडूनही आता प्राध्यापक आंदोलनाला पाठींबा देण्यात येत असल्याचा  दावा संघटनांकडून करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे प्राध्यापक विद्याथ्र्याचे नुकसान होऊ न देता सनदशिर मार्गाने ठिय्या आंदोलन करीत असल्याने विद्याथ्र्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े त्यामुळे सरकारने प्राध्यापक संपातील प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेच्या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा, असे सांगण्यात येत आह़े 
11 रोजी धरणे आंदोलन
दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणा:या संबंधित सर्व प्राध्यापकांचे जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आह़े यात, खान्देशातून मोठय़ा संख्येने प्राध्यापकांनी हजर रहावे असे आयोजकांकडून सांगण्यात येत          आह़ेप्राध्यापक संघटनांकडून जळगाव येथे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात येऊन प्राध्यापकांच्या मागण्या शासनार्पयत पोहचवण्याची मागणी करण्यात येणार आह़े दरम्यान, शासनाने आंदोलनाला गांभीर्याने घेत मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आह़े 
पश्चिम महाराष्ट्रात प्राध्यापकांचे तीव्र आंदोलन सुरु आह़े त्यामुळे याचा परिणाम खान्देशातही जाणवतोय की काय? अशी चिंता विद्याथ्र्यासह पालकांना होती़ परंतु प्राध्यापक संघटनांनी दाखवलेल्या संयमामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आह़े
दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी जळगावात खान्देशातून आलेल्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन होणार आह़े यानंतर प्राध्यापक संघटनांची बैठकही होण्याची माहिती मिळत आह़े यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, तोवर प्राध्यापकांकडून त्या-त्या महाविद्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार आह़े 
 

Web Title: The protest movement of the professors, beside the work force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.