चीन विरोधात निषेधाचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:43 IST2020-06-22T11:43:44+5:302020-06-22T11:43:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चिनी उत्पादनाच्या वस्तूंवर बहिष्कार आणि चिनच्या राष्टÑाध्यक्षांचा निषेध नंदुरबारात करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीतर्फे ...

चीन विरोधात निषेधाचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चिनी उत्पादनाच्या वस्तूंवर बहिष्कार आणि चिनच्या राष्टÑाध्यक्षांचा निषेध नंदुरबारात करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीतर्फे आॅनलाईन पद्धतीने जनजागृती करीत बहिष्कार करण्याचे आवाहन करण्यात आले तर एमआयएमतर्फे चिनी निषेध व्यक्त करण्यात आला.
चीनविरोधी आॅनलाइन आंदोलनात नंदुरबार येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यापुढे 'चीनी मालाची खरेदी आणि विक्री करायची नाही', हा संकल्प करण्यासाठी हिदु जनजागृती समिती आणि नागरिकांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सामाजिक संकेतस्थळावर 'चिनी वस्तूंना हद्दपार करून स्वदेशी वस्तूंचा वापर' करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नंदुरबार शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात फलक धरून 'चिनी वस्तु कचरा पेटीत टाकत आहोत' याचे चित्रीकरण अथवा छायाचित्र काढून सामाजिक संकेतस्थळावर पोस्ट करून आंदोलनात सहभाग नोंदवला.
एमआयएमतर्फे निषेध
नंदुरबार मधील इलाही चौक परिसरात चीनच्या कृत्याविरोधात चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला.
शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिंदुस्तान जिंदाबाद व चीन मुदार्बादच्या घोषणा दिल्या. यावेळी एमआयएम जिल्हा प्रमुख सैय्यद रफअत हुसैन, शोएब खाटिक, जावीद बापु, सैय्यद कमर, नईम लोहार आदी उपस्थित होते.
मनसेतर्फेही निषेधाचा सूर
मनसेतर्फेही चिनी वस्तूंचा विरोध करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. निवेदनाद्वारे त्यांनी नागरिकांना आवाहन केले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपजिल्हाप्रमुख ईश्वर ठाकुर, सचिव पवन गवळे, राकेश माळी, विवेक ठाकुर यांच्या त्यावर सह्या आहेत.