चंद्रकांत पाटील यांच्या धमकीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:07+5:302021-05-05T04:50:07+5:30

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलेला ...

Protest against Chandrakant Patil's threat | चंद्रकांत पाटील यांच्या धमकीचा निषेध

चंद्रकांत पाटील यांच्या धमकीचा निषेध

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने व त्यांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करून प्रतिक्रिया दिल्या. छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांनी झाशीच्या राणीप्रमाणे जिद्दीने लढून हा एकहाती विजय मिळविला, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र यावर भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले म्हणून तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, अशी धमकी दिली. धमकी दिल्याप्रकरणी त्यांचा निषेध करून चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष सरचिटणीस कमलेश चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Web Title: Protest against Chandrakant Patil's threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.