पाटचारींचा प्रस्ताव सिंचन विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:55 IST2019-08-14T12:55:53+5:302019-08-14T12:55:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी ...

Proposal of irrigation to Irrigation Department | पाटचारींचा प्रस्ताव सिंचन विभागाकडे

पाटचारींचा प्रस्ताव सिंचन विभागाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  शहरात पावसाळ्यात सर्वात धोकेदायक ठरलेल्या पाटचारींचा प्रस्ताव दोन वर्षापासून सिंचन विभागाकडे पाठविला असून त्याठिकाणी विकासासाठी पालिकेने सुमारे 17 कोटींचा आराखडाही     तयार केला असल्याची माहिती   जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी दिली.
गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहादा शहर पूर्णत: जलमय झाले होते. शहरातील अनेक भाग पाण्याखाली होता. त्यामुळे जनजीवनही ठप्प झाले होते. सध्या पाणी कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात अभिजित पाटील यांनी सांगितले की, शहरातून गेलेल्या  पाटचारी हा शहरासाठी गंभीर प्रश्न झाला आहे. जलसंपदा विभागाच्या पाटचा:या शहराच्या मध्यवर्ती भागातून जातात. या दोन पाटचा:या असून त्या नागरी वस्तीतून अनुक्रमे 2.2 किलोमीटर व दुसरी पाटचारी 3.91 किलोमीटर लांबीची आहे. या पाटचा:या ब्रिटिशकालीन आहेत. पाटचा:यांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. पाटचा:यांमध्ये प्लास्टीकच्या बाटल्या, गाळ, पालापाचोळा साचला असल्याने  त्यात प्रचंड घाण आहे. गेल्यावर्षी पालिकेने स्वखर्चातून नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन त्याची साफसफाई केली होती. काहींनी पाटचारींवर अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात या चा:यांमध्ये पाणी येत असल्याने गेल्या काही वर्षापासून शहराला पाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या पाटचा:यांचा शहरी हद्दीतील भाग जलसंपदा विभागाने पालिकेकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच सभेत हा ठराव केला होता व तो जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. गेल्या दोन वर्षापासून आपण स्वत: त्याचा पाठपुरावा करीत आहोत. जळगाव कार्यालयाकडून हा प्रस्ताव मंत्रालयात असून यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांशीही बोलणे झाले आहे. लवकरच हा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेने या जागेवर सुशोभिकरण व विकासाची कामे करण्यासाठी सुमारे 17 कोटींचा आराखडाही तयार केला आहे. त्यामुळे पाटचारी जलसंपदा विभागाने पालिकेकडे त्वरित हस्तांतरीत करण्याची आवश्यकता असून त्यासंदर्भात लवकरच आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. शहादा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची जबाबदारी असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून उपाययोजनाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Proposal of irrigation to Irrigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.