जलयुक्तचा निधी वाढविण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:31 PM2019-01-18T18:31:31+5:302019-01-18T18:31:37+5:30

नंदुरबार :  जलयुक्तसाठी यंदा 180 गावांची निवड करण्यात आली आहे. परंतु या गावांमध्ये कामासाठी अपु:या निधीची तरतूद करण्यात आल्याची ...

Proposal for increasing water reserves | जलयुक्तचा निधी वाढविण्याचा प्रस्ताव

जलयुक्तचा निधी वाढविण्याचा प्रस्ताव

Next

नंदुरबार :  जलयुक्तसाठी यंदा 180 गावांची निवड करण्यात आली आहे. परंतु या गावांमध्ये कामासाठी अपु:या निधीची तरतूद करण्यात आल्याची बाब स्थायी समिती सभेत स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे वाढीव निधीची मागणी करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला. दरम्यान, बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, सदस्य रतन पाडवी, सागर धामणे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे व खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला भुषा येथील घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत जलयुक्त कामांचा विषय निघाला. जास्तीत जास्त गावांचा समावेश करावा यासाठी प्रय} व्हावा अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी येत्या वर्षासाठी जलयुक्तकरीता 180 गावांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले. या गावांमध्ये कामे करण्यासाठी मंजुर करण्यात आलेला निधी कमी आहे. त्यामुळे निधी वाढून मिळावा यासाठी प्रय} करण्यात येणार असल्याची माहिती सोमवंशी यांनी दिली. यंदा दुष्काळी स्थिती आहे. नदी, नाले, बंधारे कोरडे झाले आहेत. अशा ठिकाणी जलयुक्तची कामे करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त कामे घेण्यासाठी प्रयत्न राहावा अशी अपेक्षा देखील यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.
डामळदा, ता.शहादा येथील पाणी टंचाईचा विषयय उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी उपस्थित केला. या गावाला नेहमीच पाणी टंचाई असते. त्यावर कायम स्वरूपी काय उपाययोजना करता येईल याची चाचपणी करावी. टीएसपीमध्ये प्रस्ताव पाठवावा अशा सुचना नाईक यांनी दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. 
तापीतून पाईपलाईनद्वारे उमर्देर्पयत पाणी आणले जाणार आहे. तेथून पुढे चौपाळेर्पयत ने न्यावे. आधीच उमर्दे ते चौपाळे पाईपलाईन तयार असल्याचे सदस्य सागर धामणे यांनी सांगितले. त्यावर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बडगुजर यांनी याची व्यवहार्यता आणि  तांत्रिकबाजू तपासून घेवूनच निर्णय घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 
धडगाव तालुक्यातील बांधकाम विभागाचे प्रोजेक्ट ऑफीसर नेहमीच गैरहजर राहत असल्याची तक्रार रतन पाडवी यांनी केली. तातडीने आदेश देत त्यांना नियमित हजर राहण्याची तंबी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
बैठकीत आयत्या वेळेच्या विषयांनाही मंजुरी देण्यात आली. त्यात जलयुक्त अभियानाअंतर्गत टप्पा क्रमांक चार अंतर्गत सुसरी नदीवरील होळ व उंटावद, ता.शहादा येथील साघवण बंधा:यांच्या कामासाठी अनुक्रमे 33 लाख 31 हजार व 38 लाख 23 हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. 
 

Web Title: Proposal for increasing water reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.