प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:14 IST2019-10-01T12:14:44+5:302019-10-01T12:14:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नती प्रक्रीयेसह इतर प्रश्न 5 नोव्हेंबरपयर्ंत निकाली काढण्याचे आदेश जिल्हा ...

Promoting primary teachers | प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती लागणार मार्गी

प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती लागणार मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नती प्रक्रीयेसह इतर प्रश्न 5 नोव्हेंबरपयर्ंत निकाली काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत़ जिल्हास्तरीय प्रशासकीय शिक्षक समस्या निवारण बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी हे आदेश दिल़े 
बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, गटशिक्षणाधिकारी डॉ़राहुल चौधरी, ए.डी.पाटील, ए.डी.दोडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनार, विस्तार अधिकारी जे.ए.चौरे, एम.एस.धनगर, शिक्षण आस्थापना कर्मचारी व शिक्षक परिषदेचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते. प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसह अन्य प्रश्नांसाठी 25 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती़  बैठकीत दिलेल्या मुदतीत पदोन्नती प्रक्रीया व प्रलंबित प्रश्न निकाली न निघाल्याने 19 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषदेने 31 ऑगस्टर्पयत सर्व प्रश्न निकाली काढण्याचे सांगितले होत़े  कारवाई तातडीने व्हावी यासाठी शिक्षक परिषदेने निवेदन दिले होत़े निवेदनाची दखल घेत जिल्हास्तरीय प्रशासकीय  शिक्षक समस्या निवारण बैठकीचे आयोजन करुन 5 नोव्हेंबरपयर्ंत सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आदेश विनय गौडा यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत़
यावेळी परिषदेचे देवेंद्र बोरसे, राकेश आव्हाड, रामकृष्ण बागल, आबा बच्छाव, नितेंद्र चौधरी, प्रकाश बोरसे, दिनेश मोरे, चेतना चावडा, दिनेश पाडवी, शरद घुगे, भाऊराव कोकणी, सुभाष सावंत, दीपक सोनवणे, गणेश अचिंतलवार, मनोज चौधरी, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होत़े 

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी पदोन्नती समितीचे गठण करून या समितीच्या माध्यमातून 4 ऑक्टोबर- तळोदा, 5 ऑक्टोबर-धडगांव, 7 ऑक्टोबर-शहादा, 9-ऑक्टोबर अक्कलकुवा, 10-ऑक्टोबर नवापूर, 11-ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथे तालुकास्तरीय पदोन्नती शिबिर घेण्याचे निश्चित करण्यात आले आह़े 
 

Web Title: Promoting primary teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.