दुष्काळामुळे कापूस लागवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:04 IST2019-05-13T21:04:33+5:302019-05-13T21:04:51+5:30
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात मे महिन्यात करण्यात येणारी कापूस लागवड यंदा लांबणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

दुष्काळामुळे कापूस लागवड लांबणीवर
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात मे महिन्यात करण्यात येणारी कापूस लागवड यंदा लांबणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचे मुख्य कारण परिसरात झपाट्याने खालावत जाणारी पाणीपातळी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांकडून शेत नांगरटीसह वखरणी, सरी बनवनू तयार करण्यात येत आहे. तरी कापसाला पाणी देणे कठिण जाणार असल्याचा अंदाज आल्याने १५ मेला होणारी कापूस लागवड तूर्त टळणार आहे.
कापूसहे उष्ण कटीबंधीय पीक असल्याने हे वातावरण कापूस लागवडीस योग्य असले तरी कापसाला पुरेसे पाणी न मिळाल्यास तापमान वाढीमुळे मुळांची वाढ होऊ शकणार नाही. त्यामुळे झाडे दगावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान शेतकरींकडून कापसाच्या विविध वाणांविषयी चाचपणी करण्यात येत असून, कृषी विभागाकडून शेतकºयांना बोगस बियाणे खरेदीपासून घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.