आश्रमशाळांवर प्रकल्पधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 11:52 IST2019-12-28T11:52:43+5:302019-12-28T11:52:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चालवल्या जाणाºया आश्रमशाळांमध्ये प्रकल्पाधिकारी वसुमना पंत ...

Project Surgical Strike at Ashram Schools | आश्रमशाळांवर प्रकल्पधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

आश्रमशाळांवर प्रकल्पधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चालवल्या जाणाºया आश्रमशाळांमध्ये प्रकल्पाधिकारी वसुमना पंत आणि अविशांत पांडा यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत मध्यरात्री भेटी दिल्या़ दोघांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात दिलेल्या भेटीमुळे आश्रमशाळांवर एकच गहजब झाला़ या तपासणीदरम्यान १३ जणांवर कारवाई क२ाण्यात आली़
नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाºया नवापुर, शहादा व नंदुरबार तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रशासन, गुणवत्ता आणि व्यवस्थापन यात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, सहायक लेखाधिकारी किशोर गोसावी, कार्यालय अधिक्षक भानुदास वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी सी़जी़पाटील, प्रकाश वसावे, निर्मल माळी, सुनील पाटील, रविंद्र निकम, सुभाष पाटील यांच्यासह गुरुवारी सायंकाळनंतर प्रकल्पांतर्गत तीन तालुक्यातील २२ आश्रमशाळांना भेटी दिल्या़ रात्री दोन वाजेपर्यंत ही तपासणी सुरु होती़
या भेटीदरम्यान मुख्यालयी न थांबणारे मुख्यापक, अधिक्षक व कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई केली़ या कारवाईमुळे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली होती़ अनेक ठिकाणी कर्मचारीच आढळून आलेले नसल्याने कारवाई करण्यात आली आहे़ नंदुरबार प्रकल्पात तब्बल १३ जणांवर कार्यालयीन कामकाजात कुचराई केल्याचा ठपका ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे़ प्रकल्पाधिकारी पंत आणि पांडा यांनी शुक्रवारी रात्रीही काही ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची माहिती
तळोदा
तळोदा प्रकल्पातील धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळांवर प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांनी भेटी दिल्या़ सहायक प्रकल्प अधिकाºयांसह चार पथक बनवून त्यांनी शुक्रवारी पहाटेपर्यंत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात तसेच तळोदा तालुक्यातील एकूण २० आश्रमशाळांची तपासणी करण्यात आली़ या भेटीदरम्यान दुर्गम भागात कर्मचारीच हजर राहत नसल्याचे भीषण वास्तव पुन्हा नव्याने समोर आले आहे़ अविशांत पांडा यांनी आश्रमशाळांचे व्यवस्थापन, शिस्त व कामकाजाची माहिती घेतली. भेटीत गैरहजर मुख्याध्यापक, अधीक्षक व कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई केली़
मोहिमेत प्रकल्प अधिकारी पांडा यांच्यासह सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, एन.डी. धनगर, एस.डी. दोमकोंडेकर, शैलेश पाटील, एस.एम. चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी एन.डी. ढोले व बबनराव मुगळे हे सहभागी झाले होते़

Web Title: Project Surgical Strike at Ashram Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.