प्रकल्प अधिकारी अटकेत
By Admin | Updated: January 20, 2017 00:21 IST2017-01-20T00:21:35+5:302017-01-20T00:21:35+5:30
शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील सेवानिवृत्त सहायक प्रकल्प अधिकारी मगन साक:या पाडवी यांना अटक करण्यात आली आहे.

प्रकल्प अधिकारी अटकेत
तळोदा : शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील सेवानिवृत्त सहायक प्रकल्प अधिकारी मगन साक:या पाडवी यांना अटक करण्यात आली आहे.
तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विद्यार्थी शिष्यवृत्तीचा आठ कोटी 79 लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला होता. तत्कालिन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्यासह एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मगन पाडवी यांना तळोदा येथील त्यांच्या निवासस्थातून बुधवारी रात्री अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.