सीईटी परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST2021-09-19T04:31:36+5:302021-09-19T04:31:36+5:30

ते १ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस ...

Prohibition order in CET examination center premises | सीईटी परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

सीईटी परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश

ते १ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार परीक्षा केंद्राच्या २00 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशित केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी सामायिक परीक्षा ही डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शहादा

(लोणखेडा परिसर ) या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने सकाळी व दुपारी या दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये.

हे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाहीत. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Prohibition order in CET examination center premises