अक्कलकुवा पंचायत समितीत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:15+5:302021-03-10T04:31:15+5:30
अध्यक्षस्थानी पं.स. सभापती मनीषा वसावे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती विजय पाडवी, प्रभारी गटविकास अधिकारी महेश पोतदार, कक्ष अधिकारी ...

अक्कलकुवा पंचायत समितीत कार्यक्रम
अध्यक्षस्थानी पं.स. सभापती मनीषा वसावे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती विजय पाडवी, प्रभारी गटविकास अधिकारी महेश पोतदार, कक्ष अधिकारी गणेश भामरे, कृषी विस्तार अधिकारी दीपाली आडायगे, कार्यालय अधीक्षक अनिल कोकणी, गटशिक्षण अधिकारी आर.आर. देसले, विस्तार अधिकारी भीमराव मोहिते, एम.आर. निकुंभ, कनिष्ठ सहायक रवींद्र साळवे, सचिन मगरे आदी उपस्थित होते. यावेळी उपसभापती पाडवी म्हणाले की, गल्ली ते दिल्लीपर्यंत महिला आघाडीवर असून, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने निर्णय घेण्यात अग्रेसर असणारी महिला निर्माण झाली आहे. स्त्रीला आई, पत्नी, बहीण, आजी, आत्या असे प्रत्येक नात्यातून ओळखले जाते, म्हणूनच तिला पुराणकाळापासून सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी पं.स.च्या कनिष्ठ अभियंता वासंती बोरसे, कनिष्ठ लेखाधिकारी कविता नवले, छाया साळवे, कनिष्ठ सहायक शीतल भामरे, सपना गावित, स्थापत्य अभियंता वैशाली चौरे, ए.व्ही. धपाटे, भारती भोसले, रुपाली बेडसे, कनिष्ठ सहायक नम्रता नाईक, रंजना गायकवाड, प्रियंका वसावे, योगेश्वरी ठाकूर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक पंकज पाटील यांनी केले, सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत चव्हाण यांनी तर आभार कनिष्ठ सहायक शीतल भामरे यांनी मानले.