शिवपूर येथे शेती दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:16 IST2020-02-08T13:15:05+5:302020-02-08T13:16:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : नंदुरबार तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील शिवपूर येथे हरभरा पिकाच्या शेती शाळेचा समारोप आर.एम. ...

शिवपूर येथे शेती दिनानिमित्त कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टे : नंदुरबार तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील शिवपूर येथे हरभरा पिकाच्या शेती शाळेचा समारोप आर.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेती दिन या कार्यक्रमात करण्यात आला.
या वेळी शिवारातील २५ शेतकऱ्यांची निवड करून गणेश वळवी यांच्या हरभरा पिकाच्या क्षेत्रावर आठ प्रशिक्षण वर्गातून निवडलेल्या शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान, मित्र व शत्रू किडीची ओळख व त्यांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याबद्दल शेती शाळेचे तज्ज्ञ मार्गदर्शक करणसिंग गिरासे यांनी केले.
याप्रसंगी संजय वसावे, धरमदास पाडवी यांनी शेतीशाळेमुळे हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीच्या बाबतीत तरबेज झालेले असल्याचे सांगितले. मंडळ कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले. या वेळी सरपंच सुधीर पाडवी यांनी गावात शेतीशाळा आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे आभार मानले. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक करणसिंग गिरासे, स्नेहल पाडवी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गिरासे तर आभार कृषी पर्यवेक्षक सुरेंद्र चौरे यांनी मानले.