गिरीविहार परिसरात व्यावसायिकांमध्ये भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:12 IST2019-06-14T12:12:27+5:302019-06-14T12:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांकडून गिरीविहार परिसरातील व्यावसायिकांना रात्री 10 र्पयत व्यवसाय बंद करण्यासाठी ...

गिरीविहार परिसरात व्यावसायिकांमध्ये भिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांकडून गिरीविहार परिसरातील व्यावसायिकांना रात्री 10 र्पयत व्यवसाय बंद करण्यासाठी धमकावले जात आह़े या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भिती निर्माण झाली असून याकडे पोलीस दलाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आह़े
परिसरातील व्यावसायिकांनी पोलीस अधिक्षक संजय पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गिरीविहार परिसरात व्यवसाय आहेत़ परिसरात उपनगर पोलीस ठाणे निर्मिती झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला होता़ परंतू गेल्या दोन महिन्यांपासून या भागात दहशतीचे वातावरण आह़े उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत 10 वाजेर्पयत दुकाने बंद करण्यास व्यावसायिकांना भाग पाडतात़ रात्री 10 र्पयत सर्वच जण व्यवसाय बंद करतात़ परंतू ब:याच वेळा दुकानातील इतर कामे आणि आवराआवर करण्यास उशिर होतो़ अशावेळी लाईट बंद करण्यास सांगणे आणि मारहाणीचे प्रकारही घडले आहेत़ परिसरात परवानाधारक मद्यविक्रीचे दुकान आह़े हे दुकाने रात्री 11 र्पयत विनासायस सुरु असताना इतर व्यावसायिकांना मात्र 10 वाजता दुकाने बंद करण्यास सांगून पोलीसांकडून व्यावसायिकांची गळचेपी होत असल्याने कारवाईची मागणी करण्यत आली आह़े निवेदनावर परिसरात व्यावसायिकांच्या सह्या आहेत़