प्रकल्प बाधितांकडून पापडी वालचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:26+5:302021-02-11T04:33:26+5:30

अद्यापपोवेतो वाल हे सातपुडा परिसरात ग्रामीण भागात घराच्या अवती भोवती, शेतबांधावर, परस बागांमध्येच लावलेले दिसत होते. परंतु प्रथमच हे ...

Production of papadi hair from project victims | प्रकल्प बाधितांकडून पापडी वालचे उत्पादन

प्रकल्प बाधितांकडून पापडी वालचे उत्पादन

अद्यापपोवेतो वाल हे सातपुडा परिसरात ग्रामीण भागात घराच्या अवती भोवती, शेतबांधावर, परस बागांमध्येच लावलेले दिसत होते. परंतु प्रथमच हे शेंगवर्गीय पिकाची लागवड बाधिताने करून उत्पन्न घेतल्याने उत्पादनातून अर्थाजनासोबतच जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होणार असून, त्याबरोबरच पिकांची फेर पालट होण्यासाठीही हे पीक महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या पापडी वाल बाजारपेठेत ३० ते ३५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात येत असून, थंडीत खवैय्यांकडून वालला वाढती मागणी आहे. ह्या शेंगाची पाच ते सात दिवसांनंतर तोडणी करण्यात येत आहे.

कमी खर्चात वालचे उत्पादन

वालचे बियाणे स्वस्त मिळत असून, लागवड केल्यानंतर दोन - अडीच महिन्यात तोडणी सुरू होत असते. तसेच या पिकाला सिंचनाचीही जास्त गरज नसून, रासायनिक खतांचीही आवश्यकता भासत नसून, ढगाळ हवामान असल्यास फवारणी करावी लागते. त्यामुळे इतर पिकांपेक्षा पापडी वालच्या उत्पादनास कमी खर्च लागत असल्याचे उदेसिंग पावरा यांनी सांगितले.

Web Title: Production of papadi hair from project victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.