अतिक्रमणासह समस्यांनी प्रभाग 17 ची जनता बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:50 IST2019-08-26T11:50:34+5:302019-08-26T11:50:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील प्रभाग 17 मधील अतिक्रमण हटवून समस्या सोडवाव्या अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली ...

Problems with encroachment made the people of Division 17 unemployed | अतिक्रमणासह समस्यांनी प्रभाग 17 ची जनता बेजार

अतिक्रमणासह समस्यांनी प्रभाग 17 ची जनता बेजार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील प्रभाग 17 मधील अतिक्रमण हटवून समस्या सोडवाव्या अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 17 मध्ये साक्री नाका समोरील पालिकेची उद्यानाची पडीत जागा आहे. या ठिकाणी परिसरातील रहिवाशांनी कब्जा करणे सुरू केले आहे. त्यामुळे जागा बंदीस्त करून अतिक्रमण हटवावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पारशी चक्कीर्पयतच्या रस्त्याची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. वर्षभरापूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता. याच भागात काँक्रीटचा रस्ता तोडून बांधकाम सुरू आहे. वहिवाट रस्ता बंद करण्यात आला आहे. दंगलीच्या वेळी या भागात पालिकेचे चार बाय 20 आकाराचे लोखंडी डिव्हायडर अंदाजे वजन 10 ते 12 क्विंटलचे या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. ते पडून असल्यामुळे चोरटे त्याचे लोखंड कापून विक्री करीत आहेत. 
शिवाजीरोड ते दादा गणपती, गणपती मंदीररोड यासह इतर रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या समस्या तातडीने सोडविण्यात येवून या भागातील रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात अशोक मंगा चौधरी यांनी केली आहे.    
 

Web Title: Problems with encroachment made the people of Division 17 unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.