गुरुकुल नगरातील गटारींमुळे समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST2021-08-19T04:34:00+5:302021-08-19T04:34:00+5:30
दुर्गम भागात लसींचा पुरवठा करावा धडगाव : तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील लसींचा पुरवठा करण्याची मागणी आहे. अनेक ...

गुरुकुल नगरातील गटारींमुळे समस्या
दुर्गम भागात लसींचा पुरवठा करावा
धडगाव : तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील लसींचा पुरवठा करण्याची मागणी आहे. अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य केंद्रांसोबतच उपकेंद्रांमध्ये लसींचा पुरवठा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने साप निघण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून अपाय होण्याची भिती आहे.
व्यवसाय सुरु झाल्याने समाधानी
नंदुरबार : शहराच्या विविध भागात रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. विविध चाैकांमध्ये गाड्या लावून व्यवसाय करणारे हे विक्रेते गेल्या दीड वर्षांपासून बेरोजगारीच्या फेऱ्यात अडकले होते. आता व्यवसाय सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पॅसेंजर गाड्या सुरु झाल्याने वाढली वर्दळ
नंदुरबार : रेल्वेस्थानकावर अनलाॅकमुळे गर्दी होत आहे. सुरत मार्गावरच्या पॅसेंजर गाड्या सुरु झाल्या असल्याने ही वर्दळ वाढल्याचे दिसून आले आहे. यंदा फेब्रुवारीपासून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली होती. त्यानंतर पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतू आता पूर्णपणे गाड्या सुरु झाल्या असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.