करण चाैफुलीवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:42+5:302021-08-17T04:36:42+5:30
रस्त्यात वाहने आडवी लावणाऱ्यांमुळे त्रस्त नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैक ते बायपास रोडदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पुढे एका ...

करण चाैफुलीवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर
रस्त्यात वाहने आडवी लावणाऱ्यांमुळे त्रस्त
नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैक ते बायपास रोडदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पुढे एका घरासमोर सोमवारी अचानक चारचाकी व दुचाकी वाहन लावून रस्ता अडवण्यात आल्याचा प्रकार दिसून आला आहे. यामुळे मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली होती. यापूर्वीही याठिकाणी पाच दिवस रस्ता अडवण्यात आला होता. या प्रकारामुळे गंभीर अपघात घडण्याची भीती आहे.
दुर्गम भागात कचरा संकलनाची समस्या
धडगाव : शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगर पंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अक्कलकुवा शहरात स्वच्छतागृहांची वानवा
अक्कलकुवा : शहरातील विविध भागांत स्वच्छतागृहांची वानवा असल्याचे दिसून आले आहे. यातून शहरात बाहेरगावाहून येणारे नागरिक मोकळ्या जागांचा वापर करत असल्याने घाण व अस्वच्छता निर्माण होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याचे चित्र आहे.