नाईक विद्यालयात बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:43+5:302021-02-05T08:11:43+5:30
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने शहादा उपविभागीय कार्यालयातर्फे वसंतराव नाईक विद्यालयात चित्रकला, निबंध, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...

नाईक विद्यालयात बक्षीस वितरण
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने शहादा उपविभागीय कार्यालयातर्फे वसंतराव नाईक विद्यालयात चित्रकला, निबंध, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार राजेंद्र नांदोडे, संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव, समन्वयक संजय राजपूत, प्राचार्य डाॅ.ए.एस. पाटील, प्राचार्य सुनील सोमवंशी, उपप्राचार्य आर.जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक एन.बी. कोते उपस्थित होते. या वेळी मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना समिती व सांस्कृतिक समितीने कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रांताधिकारी डाॅ.गिरासे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. प्रास्तविक तहसीलदार डाॅ.कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.जे. माळी यांनी तर आभार प्रा.के.आर. भावसार यांनी केले. प्रा.एल.आय. भावसार, प्रा.सी.जी. विसपुते, प्रा.एस.बी. पवार, प्रा.आय.बी. पिंजारी यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.