खाजगी प्रवासी वाहतूक ठप्पच, कालीपिली चालक होताहेत बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:44 IST2020-08-03T12:44:23+5:302020-08-03T12:44:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.वाहतूक सेवा केवळ शहरांसाठीच आणि तीही तुरळक असली तरी कालीपिली किंवा तीनचाकी खाजगी प्रवासी ...

खाजगी प्रवासी वाहतूक ठप्पच, कालीपिली चालक होताहेत बेरोजगार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस.टी.वाहतूक सेवा केवळ शहरांसाठीच आणि तीही तुरळक असली तरी कालीपिली किंवा तीनचाकी खाजगी प्रवासी वाहतुकीलाही पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. लोकांमध्ये प्रवासाविषयीची धास्ती आणि शहरात बाजारासाठी आले तर खाजगी चारचाकी किंवा दुचाकीला प्राधान्य राहत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ६०० पेक्षा अधीक कालीपिली तसेच तीन चाकी प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत. लॉकडाऊनपासून या वाहनचालकांचा व्यवसाय पुर्णत: ठप्प झाला आहे. आता अनलॉकडाऊन सुरू होऊन आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमांचे बंधन घालून परवाणगी दिली असली तरी प्रवासीच नसल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प आहे.
स्विकारला दुसरा व्यवसाय
प्रवासी नाही, दैनंदिन उत्पन्न नाही, दुसरीकडे कर्जाने घेतलेल्या वाहनाचा हप्ता थकत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी दुसरा व्यवसाय स्विकारला आहे. जेणेकरून हप्ते तरी भरता येतील किंवा घरखर्च तरी निघेल. काहींनी आपल्या गावाकडे जाऊन शेती करण्यास सुरुवा केली आहे.
प्रवासीच येत नाहीत...
जिल्ह्यातील चारही आगारातून शहरी भागासाठी एस.टी.प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु ती देखील अगदीच तुरळक आहे. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांकडे प्रवाशांचा ओढा राहील अशी अपेक्षा होती. परंतु कोरोनाच्या भितीमुळे प्रवास करायला अनेकजण धजावत नसल्याची स्थिती आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी देखील कालीपीलीचा वापर कमीच होत आहे. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.