जिल्ह्यातील खासगी डॉक्टर्स कोरोना लसीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:29+5:302021-02-16T04:32:29+5:30

जिल्ह्यात सध्या कोविड लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. कोरोना काळात ज्यांनी सेवा दिली ...

Private doctors in the district are deprived of the corona vaccine | जिल्ह्यातील खासगी डॉक्टर्स कोरोना लसीपासून वंचित

जिल्ह्यातील खासगी डॉक्टर्स कोरोना लसीपासून वंचित

जिल्ह्यात सध्या कोविड लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. कोरोना काळात ज्यांनी सेवा दिली त्या कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे त्यातील अनेक जण लसीपासून वंचित आहेत तर दुसरीकडे ज्या खासगी डॉक्टरांनी लाॅकडाऊनच्या काळात वैद्यकीय सेवा देऊन रुग्णांचे प्राण वाचविले त्या डाॅक्टरांची संबंधित आरोग्य उपकेंद्राकडून नोंदणी होऊनही बहुतेक डाॅक्टरांना लसीकरण करण्यात आले नाही. काही ठिकाणी खासगी डाॅक्टरांची नोंदही आरोग्य विभागाकडून झालेली नाही. जिल्ह्यातील पोलीस पाटील, मेडिकल व्यावसायिक, आशा कार्यकर्ती, आरोग्य अधिकाऱ्यांचे वाहनचालक यांना कोरोना लस उपलब्ध होते पण ज्यांनी शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले त्या खासगी डॉक्टरांना लस दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार सनंसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: Private doctors in the district are deprived of the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.