चारा साठवणुकीत कट्टीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:22 PM2020-02-19T12:22:30+5:302020-02-19T12:22:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मर्यादित जागेमुळे कडबा साठवण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांकडून खरीप ...

Priority to katis in fodder storage | चारा साठवणुकीत कट्टीला प्राधान्य

चारा साठवणुकीत कट्टीला प्राधान्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मर्यादित जागेमुळे कडबा साठवण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील कडब्याची कुट्टी करण्यात येत आहे.
मागील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक राहिले, त्यात पशुपालकांना अपेक्षेनुसार चारा उपलब्ध झाला. परंतु पाऊस पिके काढणीचा हंगाम संपल्यानंतरही कायम राहिला, अतिवृष्टी व अवकाळीही झाला. त्यामुळे चारा ओला होऊन खराब झाला, परिणामी पशुपालकांच्या समस्या नेहमीपेक्षा अधिक वाढल्या. डिसेंबर महिन्यातच चारा टंचाई निर्माण झाली, या अडचणीतच शेतकऱ्यांनी काही प्रमाणात चारा कडबा वाचवण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षीत राहिलेला कडबा पुन्हा साठवून ठेवण्याची पशुपालक व शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे. प्रत्येक पशपालक व शेतकºयांकडे जागा मर्यादित आहे, शिवाय जागा असली तरी चारा कमीत-कमी जागेत साठवता यावा, यासाठी पशुपालक व शेतकºयांकडून कडब्याची कुट्टी करण्यात येत आहे. लहान शहादे परिसरातील प्रत्येक शेतकºयांकडून याच पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून ज्वारीच्या कडबा बारीक करण्यात येत आहे. ही कुट्टी साठवितांना कमी जागा लागत आहे.

Web Title: Priority to katis in fodder storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.