प्राचार्य सुनील सोमवंशी सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST2021-06-01T04:22:56+5:302021-06-01T04:22:56+5:30
सुनील सोमवंशी यांनी वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातच माध्यमिक शिक्षण घेतले होते. त्याच विद्यालयात १९८७ साली ते उपशिक्षक म्हणून सेवेत ...

प्राचार्य सुनील सोमवंशी सेवानिवृत्त
सुनील सोमवंशी यांनी वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातच माध्यमिक शिक्षण घेतले होते. त्याच विद्यालयात १९८७ साली ते उपशिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. त्यानंतर संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेत २०१५ साली त्यांना पर्यवेक्षक म्हणून, तर २०१९ मध्ये प्राचार्य म्हणून पदोन्नती दिली. एखाद्या शाळेचा माजी विद्यार्थी त्याच शाळेचा प्राचार्य होणे ही भाग्याची गोष्ट असते, हे भाग्य सुनील सोमवंशी यांना लाभले. वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा या एकाच शाळेत त्यांनी सलग ३४ वर्षे सेवा करून ३१ मे रोजी प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त झाले. संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी यांच्या सहकार्याने ३४ वर्षे चांगली सेवा करू शकलो, असे सांगत सोमवंशी यांनी संस्थाचालक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष सुधीर जाधव, प्रतिमा जाधव, सचिव प्रा. संजय जाधव व वर्षा जाधव यांचे त्यांनी आभार व्यक्त करून संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, उपप्राचार्य आर.जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक एन. बी. कोते, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सुनील सोमवंशी यांचे अभिनंदन करून सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.