पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबारातील प्रचारसभा स्थळी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:33 IST2019-04-22T13:27:51+5:302019-04-22T13:33:17+5:30
नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबार येथील नियोजीत प्रचारसभा स्थळी दाखल झाले आहेत़ तत्पुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबारातील प्रचारसभा स्थळी दाखल
नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबार येथील नियोजीत प्रचारसभा स्थळी दाखल झाले आहेत़ तत्पुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी एक वाजेच्या सुमारास सभेच्या ठिकाणी आगमण झाले होते़ नंदुरबार येथे प्रचारसभा घेण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी पिंपळगाव (नाशिक) येथील सभेला संबोधित केले होते़ दरम्यान, नंदुरबारातील सभा सकाळी ११.३० वाजेला नियोजीत करण्यात आली होती़ त्यामुळे सकाळपासून कार्यकर्ते सभास्थळी दाखल झालेले होते़