महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:13 IST2020-08-04T13:13:16+5:302020-08-04T13:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ...

महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील तहसील आणि उपविभागीय कार्यालयातही कार्यक्रमाचे वेळी कर्मचाºयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे: कोतवाल संवर्ग-लक्ष्मण गावीत, करंजी बु.ता.नवापूर, मुकुंद पवार तहसील कार्यालय अक्कलकुवा, सुनिल पावरा, पिंगाणे ता.शहादा, शिपाई संवर्ग-सागर सनसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, कविता बारी उपविभागीय अधिकारी कार्यालय नंदुरबार, देविचंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा, सागर आव्हाड.
तहसील कार्यालय अक्राणी वाहन चालक-राजेंद्र गिरासे, तहसील कार्यालय शहादा, लिपीक-हितेंद्र चत्रे, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, तुषार साळुंखे, तहसील कार्यालय नंदुरबार, गजानन जांबरे तहसील कार्यालय तळोदा, कपिल परदेशी तहसिल कार्यालय शहादा तलाठी संवर्ग-बळीराम चाटे, तहसील कार्यालय तळोदा, अमोल बोरसे तहसील कार्यालय अक्राणी मंडळ अधिकारी-भानुप्रिया सुर्यवंशी म्हसावद, अव्वल कारकून-सुनिल खैरनार जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार नायब तहसिलदार-विजय कच्छवे अक्कलकुवा, तहसिलदार-भाऊसाहेब थोरात नंदुरबार, उपजिल्हाधिकारी-बबन काकडे नंदुरबार, अपर जिल्हाधिकारी-महेश पाटील नंदुरबार यांचा समावेश आहे.