नवापुरात तालुका प्रशासनातर्फे गौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:37+5:302021-08-17T04:36:37+5:30

तालुक्यात कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या सुमारे २०० कोरोनायोद्ध्यांचा गौरव करण्यात आला. आमदार शिरीष नाईक, भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत, तहसीलदार ...

Pride ceremony by taluka administration in Navapur | नवापुरात तालुका प्रशासनातर्फे गौरव समारंभ

नवापुरात तालुका प्रशासनातर्फे गौरव समारंभ

तालुक्यात कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या सुमारे २०० कोरोनायोद्ध्यांचा गौरव करण्यात आला. आमदार शिरीष नाईक, भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत, तहसीलदार मंदार कुळकर्णी, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, विरोधी गटनेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक व नगरसेविका यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नि:स्वार्थ भावनेने कोरोना काळात सेवा देणाऱ्या आणि अत्यंत भयावह वातावरणात कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची प्रत्येक धर्माच्या चालीरितीनुसार अंत्यविधीसाठी मदत करणारे रज्जाकभाई पिंजारी यांच्या सत्कार करताना अनेकांना गहिवरून आले. या वेळी आमदार शिरीष नाईक, तहसीलदार मंदार कुलकर्णी, भरत गावित, सोशियल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत नगराळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक जयस्वाल यांनी तर आभार राहुल शिरसाठ यांनी मानले.

Web Title: Pride ceremony by taluka administration in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.