लायन्सतर्फे गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:59+5:302021-08-20T04:34:59+5:30
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे, लायन्स फेमिना क्लब अध्यक्षा हीना रघुवंशी, लायनेस अध्यक्षा सुप्रिया कोतवाल, लायन्स क्लब ...

लायन्सतर्फे गौरव सोहळा
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे, लायन्स फेमिना क्लब अध्यक्षा हीना रघुवंशी, लायनेस अध्यक्षा सुप्रिया कोतवाल, लायन्स क्लब नंदुरबारचे अध्यक्ष शेखर कोतवाल उपस्थित होते. कोरोना लाटेत जिल्हावासीयांचे रक्षण करण्यात जिल्हा रुग्णालयाच्या सर्व टीमचे मोठे योगदान होते. यात डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, आरोग्य सेवक, लॅब तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक, सुरक्षा रक्षक व सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे सफाई कर्मचारी आदींचा समावेश होता. या रुग्णालयातील २०४ कोरोना योद्धांचा लायन्स क्लब नंदुरबारच्या वतीने अध्यक्ष शेखर कोतवाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी डॉ.राजेश वसावे म्हणाले की, लायन्ससारख्या जागतिक पातळीवरील समाजसेवी संघटनेने येथे येऊन आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांचा सन्मान केल्यामुळे उत्साह दुणावला आहे. अजून रुग्ण सेवा करण्याच्या विचारास बळ मिळाल्याचे सांगितले. शेखर कोतवाल यांनी लायन्स क्लब हा रुग्ण व जिल्हा रुग्णालय यामधील दुवा म्हणून कार्य करीत असते. भविष्यातही रुग्ण सोयीसाठी रुग्णालय प्रशासनास काही मदत लागली तर ती करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन ट्रेझरर निमेष गोसलिया यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा पाटील यांनी तर आभार सचिव राहुल पाटील यांनी मानले.