बर्डी आश्रमशाळा ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याच्या अध्यक्षांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:06 IST2020-09-12T12:06:36+5:302020-09-12T12:06:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बर्डी ...

President's instructions to blacklist Birdie Ashram contractor | बर्डी आश्रमशाळा ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याच्या अध्यक्षांच्या सुचना

बर्डी आश्रमशाळा ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याच्या अध्यक्षांच्या सुचना


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बर्डी आश्रमशाळा बांधकाम ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या. दरम्यान, कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे अनेकवेळा बैठकीत व्यत्यय आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झाली. उपाध्यक्ष राम रघुवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती अभिजीत पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत आदींसह सदस्य सहभागी झाले होते. बैठकीत सदस्यांनी प्रश्न व समस्या उपस्थित केल्या. सी.के.पाडवी यांनी बर्डी, ता.अक्कलकुवा आश्रम शाळेत पाणी पुरवठ्याची कामे झाली नाही. काम न करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी केली. अध्यक्षा वळवी यांनी ठेकेदाराने काम केलेले नाही. त्यामुळे त्याचा निधीही परत गेला आहे. ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे अशा सुचना त्यांनी दिल्या.
देवमन पवार यांनी आष्टे आरोग्य केंद्रातील कुपनलिका सुरू करावी अशी मागणी केली. तसेच या गटातील अंगणवाडी सुपरवायझर यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यामुळे बालआरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी या भागात रिक्त पदे आहेत. नवीन पदे भरली जाणार आहेत. सुपरवायझरच्या फिरस्तिीचे टाईम टेबल ठरवून दिले जाईल असे सांगितले.
मधुकर नाईक यांनी आमलान नळ पाणी पुरवठा योजना पुर्ण होऊनही सरपंचांना बिलांसाठी फिरवले जात असल्याचे सांगितले. तसेच सदस्य खाते प्रमुखांना भेटावयास गेले तर अधिकारी मोबाईलवर ठेकेदाराशी बोलण्यात दंग असतात. सदस्यांना ताटकळत ठेवले जात असल्याची तक्रार केली. त्यावर अध्यक्षांनी अधिकाऱ्यांचे असे वागणे बरे नव्हे, असे सांगत प्रोटोकॉलनुसार वेळ द्यावा असे सांगितले.
जिल्हा परिषदेत दुपारच्या वेळी अर्थात एक ते तीन वाजेदरम्यान कर्मचारी जागेवर राहत नसल्याची तक्रार धनराज पाटील यांनी केली. दुर्गम भागातून काम घेऊन आलेला व्यक्ती तीन वाजेपर्यंत ताटकळतो. सायंकाळी वाहन भेटणार नाही म्हणून अधिकारी, कर्मचाºयाची वाट पाहून काम न होताच परततो. त्यामुळे दुपारी कर्मचाºयांना जागेवर उपस्थित राहण्याच्या सुचना द्याव्या अशी मागणी केली. उपमुख्य अधिकारी बेडसे यांनी दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान अर्धा तासाची जेवनाची सुट्टी असते. त्या व्यतिरिक्त कर्मचारी कुठे जाऊ शकत नाही. तरीही सर्व विभागांना लेखी सुचना देऊन दुपारच्या वेळी सर्व कर्मचारी उपस्थित राहतील याबाबत लक्ष देणार असल्याचे सांगितले. अर्चना गावीत यांनी लेखी तक्रारी देऊन चौकशीची मागणी केली.
जिल्हा परिषद पदाधिकारी व कर्मचारी निवासस्थान परिसरातील गवत व काटेरी झुडपे काढण्याची कार्यवाही करावी अशी मागणी देवमन पवार यांनी केली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी आॅनलाईन सहभागी झाले होते.
 

Web Title: President's instructions to blacklist Birdie Ashram contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.