नंदुरबारच्या नचिकेतने तयार केलेल्या ‘गुरु’ प्रकल्पाची राष्ट्रपतींनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:20 IST2019-11-21T12:20:24+5:302019-11-21T12:20:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नीती आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नंदुरबारचा मूळ रहिवासी आणि पुणे येथील शाळेचा विद्यार्थी नचिकेत ...

The President has noticed the 'Guru' project created by Nandurbar's Nachiket | नंदुरबारच्या नचिकेतने तयार केलेल्या ‘गुरु’ प्रकल्पाची राष्ट्रपतींनी घेतली दखल

नंदुरबारच्या नचिकेतने तयार केलेल्या ‘गुरु’ प्रकल्पाची राष्ट्रपतींनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नीती आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नंदुरबारचा मूळ रहिवासी आणि पुणे येथील शाळेचा विद्यार्थी नचिकेत मेंडकी याने तयार केलेल्या गुरुत्त्वाकर्षण प्रकल्पाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कौतूक केले आह़े बालदिनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात बालसंशोधक नचिकेत याचा गौरव करण्यात आला़  
शालेय विद्याथ्र्यामध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी केंद्र सरकारने नीती आयोगामार्फत देशभरात पाच हजार शाळांमध्ये अटल टिकरींग लॅब सुरु केल्या आहेत़ या कार्यक्रमांतर्गत संशोधक वृत्तीच्या विद्याथ्र्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती़ या स्पर्धेत देशभरातील शाळांमधील विद्याथ्र्याचे प्रकल्प मागवण्यात आले होत़े त्यात कृषी, पाणी, वीज, प्रदूषण आदी आठ विषय विद्याथ्र्याना देण्यात आले होत़े सुमारे 2 हजार 700 शाळांच्या 50 हजार मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता़ अनेक फे:यांमधून चांगले प्रकल्प निवडून शेवटी सवरेत्तम आठ प्रकल्प निवडले गेल़े सवरेत्कृष्ट प्रकल्प तयार करणा:या स्पर्धक विद्याथ्र्याना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना बालदिनाच्या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आमंत्रित करण्यात आले होत़े याठिकाणी त्यांच्याकडून प्रकल्प सादर करण्यात आल़े यात क्लीन एनर्जी या विषयात पुण्याच्या कलमाडी हायस्कूलचा विद्यार्थी नचिकेत भूषण मेंडकी व अनिकेत घिसाड या विद्याथ्र्यानी तयार केलेला ‘गुरु’ (गुरुत्त्व ऊर्जा) हा प्रकल्प राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर सादर केला होता़ त्यांच्या अनोख्या संशोधनाचे राष्ट्रपतींनी कौतूक करत गौरव केला़ दोघा विद्याथ्र्याना स्वाती काळे यांचे मार्गदर्शन लाभल़े राज्यातून निवडला गेलेला हा एकमेव प्रकल्प होता़ 
दरम्यान निती आयोगातर्फे ह्या बालसंशोधकांना विशेष व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या संशोधनाचे पेटंट मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ नंदुरबारचा रहिवासी असलेल्या नचिकेत मेंडकी याच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत असून त्याच्या कुटूंबियांनी आंनद व्यक्त केला़ 
 

Web Title: The President has noticed the 'Guru' project created by Nandurbar's Nachiket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.