जिल्ह्यातील अनेक भागांत तुरळक पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:53+5:302021-03-20T04:28:53+5:30
नंदुरबार : शुक्रवारी पहाटे जिल्ह्यातील अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. ...

जिल्ह्यातील अनेक भागांत तुरळक पावसाची हजेरी
नंदुरबार : शुक्रवारी पहाटे जिल्ह्यातील अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यात १९ ते २४ मार्च दरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पक्व झालेले पीक तसेच बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी आपला धान्य माल सुरक्षित ठेवण्यास वेळ मिळाला होता. त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजता ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. साधारणत: १० ते १५ मिनिटे पाऊस सुरू होता. पावसाचा जोर तुरळक स्वरूपाचा होता. त्यामुळे नुकसान झाले नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, येत्या काळात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाचा अंदाजदेखील वर्तविण्यात आला आहे.