राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतक:यांचा नंदुरबारात मोर्चा

By Admin | Updated: April 13, 2017 13:45 IST2017-04-13T13:45:06+5:302017-04-13T13:45:06+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला.

In the presence of Raju Shetty, the peasants of Nandurbar's Front | राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतक:यांचा नंदुरबारात मोर्चा

राजू शेट्टींच्या उपस्थितीत शेतक:यांचा नंदुरबारात मोर्चा

 नंदुरबार,दि.13- स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकरी कजर्माफी,  पुष्पदंतेश्वर साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कचेरी मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हात खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेकडो शेतकरी थेट तीन किलोमिटर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी खासदार शेट्टी यांनी शेतक:यांच्या समस्या मांडून  विविध मागण्या केल्या. त्यानंतर जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकरी कजर्मुक्त झाला पाहिजे, पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा, सिंचन प्रकल्पातून शेतीला पाणी मिळावे, शेतक:यांना घटनेनुसार संरक्षण मिळावे, 24 तास शेतीसाठी वीज मिळावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष घन:शाम चौधरी, कृष्णदास पाटील, वसंत पाटील आदींसह जिल्हाभरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: In the presence of Raju Shetty, the peasants of Nandurbar's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.