वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे वनमहोत्सवाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST2021-06-19T04:21:02+5:302021-06-19T04:21:02+5:30

प्रतिष्ठानचे प्रदीप पाटील, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, प्रा.संपत कोठारी व प्रा.अनिल साळुंके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन वनमहोत्सवाची माहिती ...

Preparations for the forest festival started by the Tree Conservation Foundation | वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे वनमहोत्सवाची तयारी सुरू

वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे वनमहोत्सवाची तयारी सुरू

प्रतिष्ठानचे प्रदीप पाटील, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, प्रा.संपत कोठारी व प्रा.अनिल साळुंके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन वनमहोत्सवाची माहिती दिली व त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. या वेळी डॉ.भारुड यांनी वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करुन मार्गदर्शन व सूचना दिल्या. आपल्या कार्यात लोकसहभाग वाढवावा, सामाजिक अंतर राखून आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. ड्रोन कॅमेराद्वारे फोटो व कार्याचे शुटींग करावी. त्याची दखल म्हणून आपण स्वत: मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. २१ हजार रोपांचे वृक्षारोपणाचे व वृक्षसंवर्धनाचे आपले उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने करावे, अशी अपेक्षा डॉ.भारुड यांनी व्यक्त केली. जुलै महिन्यात होणाऱ्या वनमहोत्सव सप्ताहात मी आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Preparations for the forest festival started by the Tree Conservation Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.