डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या स्पर्धा आयोजनाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:53+5:302021-03-08T04:28:53+5:30

नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा संकुलावर १३ व १४ मार्च असे दोन दिवस डायरेक्ट व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याने त्यासाठी ...

Preparations for direct volleyball tournament begin | डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या स्पर्धा आयोजनाची तयारी सुरू

डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या स्पर्धा आयोजनाची तयारी सुरू

नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा संकुलावर १३ व १४ मार्च असे दोन दिवस डायरेक्ट व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याने त्यासाठी तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणाची पाहणी नंदुरबार जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा खासदार डॉ. हीना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केली. स्पर्धा यशस्वीरित्या व्हाव्यात व सुसज्ज व उत्तमरित्या क्रीडागंण तयार व्हावे यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्याच्या सूचना देऊन क्रीडांगणासाठी येणारे अडथळे दूर करण्याचे संबंधितांना खासदार डॉ. हीना गावीत यांनी सांगितले.

याप्रसंगी नंदुरबार जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष व मुख्य स्पर्धा नियंत्रक योगेंद्र दोरकर, सचिव डॉ. ईश्वर धामणे, कोषाध्यक्ष बळवंत निकुंभ, स्वागत समितीचे प्रमुख प्रा. निशिकांत शिंपी, निवास व्यवस्था समितीचे प्रमुख प्रा.डॉ. दुर्योधन राठोड, क्रीडांगण व्यवस्था समितीचे प्रा.डॉ. मयूर ठाकरे, पंच मंडळ समितीचे प्रमुख विनोद पाटील, प्रा.खुशाल शर्मा, डॉ. हिवाळे, तुषार सोनवणे, रमेश शिरसाठ, दीपेश धामणे आदी उपस्थित होते.

Web Title: Preparations for direct volleyball tournament begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.