निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाकडून तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:45 IST2019-11-27T11:45:38+5:302019-11-27T11:45:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शहादा ...

निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाकडून तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक 14 गट तर पंचायत समितीचे 28 गण आहेत. 311 मतदान केंद्रे असून दोन लाख 51 हजार 159 मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याप्रमाणे आचारसंहिताही लागू झाली आहे. शहादा तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांची तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने मतदार गट-गणांचा प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. आता केंद्रनिहाय याद्या तयार करणे सुरू आहे. तालुक्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी फिरते पथक, स्थिर पथक, व्हीडिओ सर्वे लियन्स पथक, तक्रार निवारण कक्ष आदी कक्ष लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
तालुक्यातील 14 गट व कंसात आरक्षण असे : म्हसावद व पाडळदा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), लोणखेडा व कहाटूळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), कन्साई, सुलतानपूर, खेडदिगर, मंदाणे, कुढावद, प्रकाशा, मोहिदे त.श. (अनुसूचित जमाती महिला), चांदसैली व सारंगखेडा (अनुसूचित जमाती), वडाळी (अनुसूचित जाती महिला).