सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात राज्य पुरस्कार परीक्षेची पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:25+5:302021-02-06T04:58:25+5:30

प्रकाशा: येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील चार विद्यार्थी स्काउट राज्य पुरस्कार परीक्षेसाठी सहभागी झाले आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी टाळेबंदी ...

Preparation for State Award Examination at Sarvodaya Vidya Mandir Vidyalaya | सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात राज्य पुरस्कार परीक्षेची पूर्वतयारी

सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात राज्य पुरस्कार परीक्षेची पूर्वतयारी

प्रकाशा: येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील चार विद्यार्थी स्काउट राज्य पुरस्कार परीक्षेसाठी सहभागी झाले आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी टाळेबंदी करण्यात आल्याने चाचणी परीक्षा सहभागी होऊ शकले नाही, म्हणून स्काउट शिक्षक शाळेत तयारी करून घेत आहेत. याबाबत असे की, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड या संस्थेतर्फे दरवर्षी राज्य पुरस्कार परीक्षा घेण्यात येते. यंदा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेमुळे टाळेबंदी करण्यात आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेसाठी सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातून चार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुख्याध्यापक ए.के.पटेल, उपमुख्याध्यापक डी. टी. चौधरी, पर्यवेक्षिका पुष्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट शिक्षक नरेंद्र गुरव यांच्यातर्फे राज्य पुरस्कार परीक्षेची चार विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहेत. यामध्ये प्रशांत उपासनी, उमेश पाटील, शिवम समुद्रे यांच्याकडून गाठी बांधणे, स्ट्रेचर, आपत्ती व्यवस्थापन,नकाशा काढणे, हाताच्या खुणा, शिट्टींच्या खुणा, रक्तदाब मोजणी, बी.पी. सिक्स व्यायाम प्रकार, ध्वजारोहण यांसह लेखी आणि तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक करून घेण्यात येत आहेत.

प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील राज्य पुरस्कार स्काउट विद्यार्थ्यांकडून बॅण्डेजचे प्रात्यक्षिक करून दाखविताना स्काउटर नरेंद्र गुरव, सोबत स्काउट.

नकाशा काढण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवताना स्काउटर नरेंद्र गुरव, सोबत शिक्षक वैकुंठ पाटील, भरत पाटील व विद्यार्थी

Web Title: Preparation for State Award Examination at Sarvodaya Vidya Mandir Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.