खोडाई माता यात्रोत्सवाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:51 IST2019-09-27T12:51:44+5:302019-09-27T12:51:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवरात्रोत्सवानिमित्त शहरात आयोजित करण्यात येणा:या खोडाई माता यात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होणार आह़े यानिमित्त खोडाई ...

खोडाई माता यात्रोत्सवाची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवरात्रोत्सवानिमित्त शहरात आयोजित करण्यात येणा:या खोडाई माता यात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होणार आह़े यानिमित्त खोडाई माता मंदिर व परिसरात जोरदार तयारी सुरु आह़े
गत दोन दिवसांपासून खोडाई माता मंदिराची रंगरंगोटी तसेच इतर कामांना वेग देण्यात आला होता़ मंदिराच्या गाभा:यासह रस्त्यालगतच्या भिंतींवर रोषणाई करण्याचे कामही हाती घेण्यात आले आह़े या परिसरातील यशवंत विद्यालय मैदान आणि खोडाई माता रस्त्यासह परिसरात 10 दिवस यात्रोत्सव भरणार आह़े यासाठी किरकोळ विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते या भागात दाखल होत आहेत़ पोलीसांकडून मंदिराशेजारी पोलीस चौकी उभारली जाणार आह़े वार्षिक उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून याठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आह़े घटस्थापनेच्या दिवशी मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन होणार आह़े यावेळी नवस फेडणा:यांचीही गर्दी होणार असल्याने नियोजन सुरु आह़े