लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; एकीनेही घेतली नाही कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:32+5:302021-07-20T04:21:32+5:30
कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना नव्हती. परिणामी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करणे आणि गर्दीत न ...

लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; एकीनेही घेतली नाही कोविड लस
कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना नव्हती. परिणामी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करणे आणि गर्दीत न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात होती. ज्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत होती त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती. कालांतराने लस उपलब्ध झाल्यामुळे शासकीय पातळीवर लसीकरण करणे सुरू झाले. महिला आणि पुरुषांनी त्यात सहभाग घेतला असलातरी गर्भवती महिला मात्र कुठेही लसीकरण करताना दिसत नसल्याचे चित्र पाहणीद्वारे दिसून आले.
एकूण लसीकरण
सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र
१८ वर्षा वरील
पहिला डोस
५०८
दुसरा डोस
००
४५ वर्षावरील
पहिला डोस
१८१५
दुसरा डोस ६४९
गर्भवती
००
आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र
१८ वर्षा वरील
पहिला डोस
१०९१
दुसरा डोस
००
४५ वर्षावरील
पहिला डोस
४४९८
दुसरा डोस
५०१
गर्भवती
००
ग्रामीण रूग्णालय म्हसावद, ता.शहादा
पहिला डोस
५,३४५
दुसरा डोस
२१२१
गर्भवती
००
दोन जीवांची भीती
‘लसीच्या बाबतीत एकमत नाही. त्यामुळे दोन जीवांची काळजी घेताना धोका कशाला त्यामुळे लस घेतली नाही. डॉक्टरांनाही याबाबत विचारणा केली नसून, त्यांच्याकडून कुठल्याही बाबतीत माहिती मिळाली नाही. - जागृती किरण मोरे, म्हसावद
कोरोनाच्या काळात लस घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. याची आम्हालाही पूर्ण कल्पना आहे. मात्र बाळाला काही होऊ नये यासाठी लस घेण्याची हिमत होत नाही. बाळाचा जन्म झाल्यानंतर लसीकरण करून घेऊ. - रत्ना अश्विन पाटील, ब्राह्मणपुरी
न घाबरता लस घ्या
‘गर्भवती महिला तसेच मूल जन्मलेल्या महिलांना कोविड लस सुरक्षित असून, लस घेतल्यावर त्यांचा आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही लसीकरणापासून काहीही धोका नाही कोणत्याही प्रकारची शंका मनात बाळगू नये लसीकरण करून घेण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. -राजेंद्र वळवी तालुका वैद्यकीय अधिकारी शहादा