ठाणेपाडा व वाघाळे येथे कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST2021-05-30T04:24:28+5:302021-05-30T04:24:28+5:30

ठाणेपाडा व वाघाळे येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, प्रभारी तालुका ...

Pre-kharif demonstrations by Agriculture Department at Thanepada and Waghale | ठाणेपाडा व वाघाळे येथे कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व प्रात्यक्षिके

ठाणेपाडा व वाघाळे येथे कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व प्रात्यक्षिके

ठाणेपाडा व वाघाळे येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी आर.डी. वळवी व मंडळ कृषी अधिकारी सुनील गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेपाडा येथे कृषी सहाय्यक मणिलाल साबळे यांनी शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीन या बियाण्यावर बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोप अवस्थेतील येणाऱ्या रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करून दाखवली. त्यानंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे त्यानंतर सावलीत सुकवून पेरणी करण्याचे सांगितले.

कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच मूलस्थानी जलसंधारण म्हणजेच शेतातील पाणी शेतात या संकल्पनेवर आधारित मृतसरी, उताराला आडवी पेरणी, वाफे पद्धत व सरी-वरंबा पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक आर.सी. हिरे यांनी शेतकऱ्यांना डोंगर पट्ट्याला लागून असलेल्या जमिनीत केसाळ अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यावरील प्रभावी उपाययोजना सांगितली. दरम्या, एकात्मिक कीड व्यवस्थापन महाराष्ट्र ग्रामीण योजना व रोजगार हमी योजना अंतर्गत गांडूळ युनिट, नाडेप युनिट, शेततळे या बाबींची माहिती दिली. तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन हरितगृह, शेडनेट गृह या बाबींची ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी वाघाळे येथील सरपंच दिलीप गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य संतोष साबळे,कृषी मित्र प्रकाश पवार, माजी सरपंच सोमा कोकणी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. आभार कृषी सहायक शशिकांत गावीत यांनी मानले.

Web Title: Pre-kharif demonstrations by Agriculture Department at Thanepada and Waghale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.