विश्वाच्या समृद्धीसाठी प्रभू येशूची प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:35 IST2019-12-26T12:34:56+5:302019-12-26T12:35:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नाताळनिमित्त शहरातील सुवार्ता अलायन्स चर्चमध्ये विश्व समृद्धीसाठी ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली़ यावेळी जिल्ह्यातील ...

विश्वाच्या समृद्धीसाठी प्रभू येशूची प्रार्थना
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नाताळनिमित्त शहरातील सुवार्ता अलायन्स चर्चमध्ये विश्व समृद्धीसाठी ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली़ यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी येथे भेट देत नाताळच्या शुभेच्छा दिल्या़
डॉ़ राजेश जेमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ प्रारंभी रेव्हरंड अनुपकुमार वळवी यांनी नाताळ आणि प्रभू येशूच्या जीवनावर प्रवचन दिले़ प्रसंगी रेव्हरंड जे़एच़पठारे, रेव्हरंड व्ही़एम़पाटील, रेव्हरंड ग्लॅडविन जयकर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सागर कालू, आकाश पाडवी, प्रेमानंद लवणे, मार्था सुतार, नूतनवर्षा वळवी, स्रेहलता कालू, पौलस वाघमारे, राजेंद्र व्यास, विश्वास पाडवी, सत्यजित नाईक, सॅबस्टीन जयकर, डॉ़ राजेश वळवी उपस्थित होते़
सकाळी प्रार्थनेनंतर चर्चच्या आवरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले़ यात परिसरासह शहरातील विविध भागात राहणारे ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते़ नाताळच्या पार्श्वभूमीवर चर्चसह परिसरात करण्यात आलेली सजावट लक्ष वेधून घेत होती़ नाताळच्या पार्श्वभूमीवर येथे धार्मिक गीत गायनाचा कार्यक्रम झाला़
खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी याठिकाणी भेट देत ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या़ त्यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांनीही सुवार्ता अलायन्स चर्चला भेट दिली होती़
ईसाईनगर ता.नंदुरबार
नाताळनिमित्त बाहेरगावी गेलेले ईसाईनगर ता.नंदुरबार येथील ख्रिस्ती बांधव परतले आहे. नववर्ष व नाताळ साजरा करण्यात आला. यावेळी रेव्ह. लाजरस वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. ईसाईनगरात नाताळनिमित्त घरांची डागडुगी, रंगकाम, स्वच्छतेसाठी बैठका घेण्यात येत आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंब आपल्या मूळगावी परतले आहे. त्यामुळे त्यांना एकत्रित सण साजरा करता येत आहे. रेव्ह. लाजरस वळवी यांनी मार्गदर्शन करीत व्यसन, दुराचार व कोणतेही भेदभाव न पाळता येशुंच्या दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
पोदार स्कूल, नंदुरबार
पोदार स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य मुकुंद इंगळे, उपप्राचार्य गोविंद गांगुर्डे, कार्यक्रम समन्वयक नागेश लोहार आदी उपस्थित होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी वस्त्रे परिधान करीत नृत्य सादर केले. प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त पालकांसाठी आर्ट मेला अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुई पाटील व ध्वनी गुजराथी या विद्यार्थिनींनी केले.
मिशन स्कुल, ईसाईनगर
ईसाईनरगर ता. नंदुरबार येथील खाजगी मिशन शाळेत नाताळनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषा केली. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी रेव्ह.संतोष गावीत, राकेश गावीत, यशवंत गावीत, वसंत वळवी, भानुदास गोसावी आदी उपस्थित होते. स्पर्धांमध्ये फनी गेम्स, लंगडी, कबड्डी, संगित खुर्ची या स्पर्धांचा समावेश होता. सूत्रसंचालन भटू पवार यांनी केले तर आभार शेकनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी रेखा भदाणे, स्वप्नील वसावे यांनी परिश्रम घेतले.
विद्या इंग्लिश स्कूल, पथराई
पथराई ता. नंदुरबार येथील विद्या इंग्लिश स्कुलमध्ये नाताळनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषा केली. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. यावेळी शितल पाटील, अर्चना पाटील यांच्यासह सर्वर् कर्मचारी उपस्थित होते.
सुवार्ता अलायन्स चर्च
सामाजिक बांधिलकी जपत नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्चमार्फत २५ रोजी मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात नंदुरबार शहराजवळील गुरुकुल नगर, दुधाळे शिवार व धामडोद ता. नंदुरबार येथे मुकबधिर विद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम झाले.
चौपाळे ता. नंदुरबार येथील पी.जी. पब्लिक स्कुलमध्ये नाताळनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषा केली. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, अॅड. रुद्रप्रताप रघुवंशी, मुख्याध्यापिका बिंदू श्रीवास्तव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यंदा नाताळच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विविध कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून स्वीडनच्या रहिवासी कारीन ओल्सन व इंगरींद ओल्सन या दोघी बहिणीं उपस्थित होत्या़ एस़ए़मिशन इंग्लिश मेडियम स्कूलची स्थापना करणाºया ओल्सन साहेब यांच्या कन्या असलेल्या ओल्सन भगिनी येथील पाहुणचाराने भारावल्या होत्या़ पिढ्यांपासून भारतासोबत असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दोघींनी यावेळी दिला़