प्रतीक कदमला रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:31+5:302021-08-15T04:31:31+5:30
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रातील विद्यापीठांकडून राष्ट्रीय सेवा योजनेत भरीव व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या रासेयो ...

प्रतीक कदमला रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक राज्यस्तरीय पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रातील विद्यापीठांकडून राष्ट्रीय सेवा योजनेत भरीव व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या रासेयो स्वयंसेवकांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. या प्रस्तावाची राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन २०२०-२१ मध्ये नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना, त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या नि:स्वार्थ सेवेचा गौरव करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात नंदुरबारचे जी.टी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक प्रतीक माधव कदम यास महाराष्ट्र राज्य ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वितरण मुंबई येथे राज्यपाल, मंत्री व राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे.