प्रकाशा व पुरुषोत्तमनगरला रुग्ण आढळल्याने दोन्ही गावे तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:06 PM2020-08-11T13:06:20+5:302020-08-11T13:06:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा/लोणखेडा : शहादा तालुक्यातील प्रकाशा व पुरुषोत्तमनगर येथे कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याने दोन्ही ठिकाणी ...

Prakasha and Purushottamnagar were closed for three days due to illness | प्रकाशा व पुरुषोत्तमनगरला रुग्ण आढळल्याने दोन्ही गावे तीन दिवस बंद

प्रकाशा व पुरुषोत्तमनगरला रुग्ण आढळल्याने दोन्ही गावे तीन दिवस बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा/लोणखेडा : शहादा तालुक्यातील प्रकाशा व पुरुषोत्तमनगर येथे कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याने दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील प्रकाशा येथील आठ तर पुरुषोत्तमनगर येथील नऊ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
प्रकाशा गाव तीन दिवस बंद
गेल्या १४ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या अंगणवाडी सेविकेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पाच महिन्यानंतर अखेर प्रकाशा, ता.शहादा गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेत रुग्णाच्या संपर्कातील आठ व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ११ आॅगस्टपासून तीन दिवस गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकाशा येथील मिरानगर भागात राहणाऱ्या ५२ वर्षीय अंगणवाडी सेविका ह्या आठ-दहा दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांनी खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यादरम्यान या महिलेचे दोन्ही मुले परराज्यातून येथे आले. त्यांनी आईच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी घरीच विश्रांती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आठ-दहा दिवसांपासून औषधोपचार घेऊन ही महिला घरीच होती. परंतु दोन दिवसांपासून त्रास अधिकच वाढल्याने येथील आरोग्य विभागाने त्यांना जिल्हा रूग्णालयात रवाना केले. त्यानुसार रविवारी सायंकाळी त्यांचा अहवाल प्राप्त झाला व तो पॉझिटीव्ह आला. त्यामुळे गावात खळबळ उडाली. अहवाल प्राप्त होताच प्रकाशा येथील मीरानगर भागा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील, तलाठी धर्मराज चौधरी, हवालदार सुनील पाडवी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चित्ते, कर्मचारी संजय पाडवी, गोपाल भोई, राहुल पाटील, प्रमोद सामुद्रे, शशिकांत सामुद्रे तात्काळ येथे दाखल झाले. तहसीलदारांच्या सूचनेनुसार हा परिसर प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. घराच्या आजूबाजूला बॅरिकेटींग लावण्याच्या व रुग्णाचे घर व परिसरात फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी सकाळी प्रकाशा ग्रामपंचायतीने या परिसरात बॅरिकेटींग लावून रस्ते बंद केले. रुग्णाचे घर व परिसरात फवारणी करण्यात आली व गावातील नागरिकांना तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोमवारी सकाळी या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. यात रुग्णाच्या संपर्कातील त्याचा एक मुलगा, त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणारे दोन पाव विक्रेते, गावातील एक जण व मोहिदा येथील एक व दोन खाजगी डॉक्टर, तसेच महिला अंगणवाडी सेविका असल्याने तिच्यासोबत काम करणाºया दोन महिला अंगणवाडी सेविका आणि महिलेने काही दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेतले होते तेथील एक कर्मचारी अशा आठ जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेऊन अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रकाशा गाव ११ आॅगस्टपासून तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. प्रकाशा गावात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नव्हता. गावातील मंदिरे बंद असून वेळोवेळी गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येऊन खबरदारी घेतली जात होती. गावात दोनवेळा फवारणीही झाली आहे. गावात प्रथमच पाच महिन्यानंतर पहिला रुग्ण आढळल्याने योग्य ती दक्षता घेतली जात असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील यांनी दिली.
पुरुषोत्तमनगरचे नऊ जण
विलगीकरण कक्षात
शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथे कोरोनाचा प्रवेश झाला आहे. एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोना संसर्ग अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला असून या महिलेच्या संपर्कातील नऊ जणांना मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीकडून १४ आॅगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत गावातील सर्व व्यापारी संस्था बंद ठेवण्याचे तसेच गावात बाहेरगावाहून येणाºया व्यक्तीस बंदी घालण्यात आलेली आहे. गावातून अत्यावश्यक सेवा, कर्मचारी व व्यक्ती वगळता इतर नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. गावातील आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका यांचे दोन गट तयार करून कंटेनमेंट व बफर झोनमधील ७२ घरातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी हे परिश्रम घेत सरपंच ज्योती पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, ग्रामसेवक शरद पाटील, माजी पोलीस पाटील जाधव पाटील, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार मोरे, ग्रामपंचायत सदस्या वंदना चव्हाण, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, लक्ष्मीकांत पाटील, आरोग्य सेविका वैशाली गडळ, आशा कार्यकर्ती भारती पाटील उपस्थित होते.

Web Title: Prakasha and Purushottamnagar were closed for three days due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.