वीज कर्मचाऱ्यास बाप-बेट्यासह तिघांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST2021-09-19T04:31:10+5:302021-09-19T04:31:10+5:30

नंदुरबार : वीजबिल वसुलीस गेलेल्या कर्मचाऱ्यास बाप-बेट्यासह तिघांनी मारहाण केल्याची घटना शहादा येथील गुजरगल्ली भागात घडली. याप्रकरणी शासकीय कामात ...

Power worker beaten up by father and son | वीज कर्मचाऱ्यास बाप-बेट्यासह तिघांची मारहाण

वीज कर्मचाऱ्यास बाप-बेट्यासह तिघांची मारहाण

नंदुरबार : वीजबिल वसुलीस गेलेल्या कर्मचाऱ्यास बाप-बेट्यासह तिघांनी मारहाण केल्याची घटना शहादा येथील गुजरगल्ली भागात घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मणिलाल बन्सीलाल पाटील, तिलक मणिलाल पाटील व हिमालय पाटील, रा. गुजरगल्ली, शहादा असे संशयितांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, वीजबिल भरणा व वसुलीसाठी वीज कंपनीचे शहादा येथील कर्मचारी विजय इंदास पाटील हे गुजरगल्ली भागात गेले होते. त्यावेळी मणिलाल पाटील यांना त्यांनी वीजबिल भरणा करण्यासंदर्भात सांगितले. त्याचा राग आल्याने तिघांनी विजय पाटील यांना हातबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शिवाय शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला.

ही बाब वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळाल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अराक करीत आहेत.

Web Title: Power worker beaten up by father and son