आश्रमशाळेला शेतातून वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:26 IST2019-07-23T12:26:27+5:302019-07-23T12:26:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील धनराट येथील आश्रमशाळेला शेत शिवारातील कृषीपंपावरुन वीज पुरवठा होत असल्याचे समोर आले ...

आश्रमशाळेला शेतातून वीजपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील धनराट येथील आश्रमशाळेला शेत शिवारातील कृषीपंपावरुन वीज पुरवठा होत असल्याचे समोर आले आह़े यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त होत असून याकडे नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आह़े
धनराट येथे आदिवासी विकास विभागातर्फे 1973 पासून आश्रमशाळा सुरु आह़े प्राथमिक आणि माध्यमिक अशा या आश्रमशाळेत गेल्या काही वर्षात सुविधांची वानवा झाली आह़े गेल्या वर्षी आश्रमशाळेत कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता़ या घटनेनंतर येथे विविध सुविधा देण्याची गरज असतानाही कारवाई झालेली नाही़
आश्रमशाळेत तूर्तास साधारण 400 च्या जवळपास विद्याथ्र्याचे प्रवेश झाल्याची माहिती आह़े गावालगत आश्रमशाळेसमोरच वीज कंपनीचे पोल आहेत़ यामुळे तेथून वीज पुरवठा करणे रास्त असताना आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका शेतातून वीजेचा पुरवठा करण्यात आला आह़े कृषीपंपाचा वीज पुरवठा रात्री आठ आणि दिवसा आठ तास असतो़ यामुळे विद्याथ्र्याना अंधाराचा सामना करावा लागतो़ रात्री जेवणाच्या वेळेस अंधार रहात असल्याने विद्यार्थी अडचणीत येतात़ सोबतच याभागात सापांसह इतर किटकांच्या चावा घेण्याचा मोठा धोका आह़े कुत्र्यांचाही वावर पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त होत आह़े सर्व अडचणी लक्षात घेऊन नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने तातडीने वीज पुरवठा नियमित फिडरवरुन करण्याची मागणी होत आह़े याबाबत पालकांनी प्रकल्प कार्यालयासह ठिकठिकाणी निवेदन दिले होत़े परंतू कारवाई झालेली नसल्याने येत्या काळात सामाजिक संघटनांच्या साथीने आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आह़े