रेडिओ फ्रिक्वेंसी सिस्टीमवर वीज मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:45 IST2019-09-29T11:44:53+5:302019-09-29T11:45:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमांतर्गत नंदुरबार व शहादा या दोन शहरांमध्ये रेडिओ ...

Power meter on the radio frequency system | रेडिओ फ्रिक्वेंसी सिस्टीमवर वीज मीटर

रेडिओ फ्रिक्वेंसी सिस्टीमवर वीज मीटर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमांतर्गत नंदुरबार व शहादा या दोन शहरांमध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी तंत्रज्ञानावर आधारीत नवीन वीज मीटर बसविण्यात येत आहे. याद्वारे वीज ग्राहकांच्या सर्व समस्या व तक्रारी राहणार नसल्याचा दावा वीज वितरण कंपनीमार्फत करण्यात आला आहे. 
वीज वितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळांतर्गत 14 शहरांमंध्ये वीज वितरण प्रणालीत बदल करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता़ त्यात जळगांव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल ही नऊ शहरे. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपुर व दोंडाईचा हे तीन तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार व शहादा या दोन शहरांमध्ये 39 हजार 928 सिंगल फेज लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना हे नवीन मीटर बसवून दिले जात आहे. नंदुरबार शहरात आजर्पयत  तीन हजार 200 मिटर बसविण्यात आले आहे. तर शहादा शहरात देखील नवीन वीज मिटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. 
ग्राहकांना वीजेच्या वापरानुसार अचुक व वेळेत बिले उपलब्ध करुन देत प्रक्रियेला गती देण्यासाठी रेडीओ फ्रिक्वेंसी तंत्रज्ञानावर आधारित  हा नवीन मिटर बसविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.  या प्रणालीमुळे वेळेवर वीज बिल मिळत नाही, वीज वापरापेक्षा अधिक रकमेची बिले दिली जातात, अशा कुठल्याही तक्रारी राहणार नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे, त्यामुळे प्रक्रियेला गती मिळणार आहे.
रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानावर आधारित नवीन प्रणाली लागू केलेल्या काही शहरांमध्ये वीज ग्राहकांनी या मीटरला विरोध केला आह़े त्यामुळे नंदुरबार व शहादा शहरातील वीज ग्राहक या प्रणालीस कितपत सहमती देतील हे पाहणी औत्सुक्याचे ठरणार आह़े रेडीओची फ्रिक्वेंसी सेट करुन कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येते. त्यानुसारच 15 ते 20 मिटर या परिघातील रेडीओ फ्रिक्वेंसी तंत्रज्ञानावर आधारित मिटरच्या रिडींगचा डाटा एकदाच वितरण कंपनीच्या सव्र्हरमध्ये रेकार्ड होणार आहे. त्यानुसार बिले तातडीने ग्राहकांना वाटप करण्यात येण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Power meter on the radio frequency system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.