खांडबारा येथे वीज तोडणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:55+5:302021-08-28T04:33:55+5:30
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, घरगुती, वाणिज्य व उद्योग आदी वीजपुरवठा थकबाकी असणाऱ्या सर्वांचे कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबविण्यात ...

खांडबारा येथे वीज तोडणी मोहीम
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, घरगुती, वाणिज्य व उद्योग आदी वीजपुरवठा थकबाकी असणाऱ्या सर्वांचे कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत असून त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत. सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना विजेआभावी बंद पडणार आहे. तसेच रात्री पथदिवे बंद राहणार असल्याने सर्वत्र अंधाराचे वातावरण राहणार असून त्याचा गैरफायदा चोरटे घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याकडे ग्रामपंचायतींनी गांभीर्याने लक्ष देऊन विजेची थकबाकी तात्काळ भरणा करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. कनेक्शन कट करण्याची कारवाई सहायक अभियंता हर्षद वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन व फोरमन राजाराम वाघ, वरिष्ठ तंत्रज्ञ शेजवान कोकणी, राजेंद्र वसावे, गणेश गावित, रामदास पावरा हे करीत आहेत.