शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

वीज कंपनी लागली कामालाआता मिशन मान्सून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘निसर्ग’ चक्री वादळाच्या प्रभावाने झालेल्या पावसात वीज कंपनीच्या तारा व खांब तुटून नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘निसर्ग’ चक्री वादळाच्या प्रभावाने झालेल्या पावसात वीज कंपनीच्या तारा व खांब तुटून नुकसान झाले होते़ या नुकसानीतून केवळ २४ तासात बाहेर येत कंपनीने मिशन मॉन्सून सुरु केले आहे़ चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर तयार कंट्रोल रुममधून पावसाळ्याचे चार महिन्याचे कामकाज सुरु राहणार आहे़जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात एकूण ३०२ फिडर आहेत़ या फिडरवरुन जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार अशा दोन विभागात १२० मेगाव्हॅट वीज दर दिवशी नियमित देण्यात येते़ निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारपासून वेगवान वारे वाहत होते़ बुधवारी आणि गुरुवारी वादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊसही कोसळला होता़ यामुळे जागोजागी झाडे कोसळली होती़ ही झाडे वीज वितरण कंपनीच्या वाहिन्यांवर पडल्याने बºयाच ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता़ या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या २४ तासात अखंड आॅपरेशन राबवून वीज पुरवठा सुरळीत केला आहे़ यासाठी कंपनीने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्या होत्या़ यामुळे सातपुड्यात बंद झालेला वीज पुरवठा अवघ्या काही तासात सुरु झाला आहे़ ऐरवी हाच वीज पुरवठा दोन ते तीन दिवस सुरु होत नव्हता़ परंतू गुरुवारी दुपारी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात पाऊस सुरु असतानाही वीज नियमित सुरु होती़ वादळामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा धडा मिळालेल्या कंपनीने याच प्रकार कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यामुळे पावसाळ्यातही जिल्हा स्तरावरुन निर्माण केलेल्या कंट्रोल रुममधूनच कामकाज करत दुरुस्त्यांची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार आहे़गेल्या दोन दिवसात वीज वितरण कंपनीचे पोल वाकून तारा तुटल्याचे प्रकार घडल्यानंतर वीज कंपनीने पोल आणि तारा पूर्णपणे नव्याने टाकण्याचे कामकाज केले आहे़ यासाठी कंपनीने दुरुस्ती कामांपर्यंत ट्रान्सफार्मर, पोल, तारा यासह महत्त्वपूर्ण साहित्य केवळ काही वेळेत पोहोचण्याचे नियोजनही केले होते़

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा या दोन तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता़ याठिकाणी पोल पडल्याने दुरुस्त्यांना वेग देण्यात आला़ बुधवारी रात्री खंडीत झालेला वीज पुरवठा गुरुवारी दुपारनंतर सुरळीत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले़ राजबर्डी ता़ धडगाव परिसरात तीन मुख्य वाहिनीचे पोल बदलून अतीदुर्गम भागातही वीज पुरवठा सुरळीत झाला़पावसाळ्यात पुन्हा दुरुस्तीचे संकट उभे राहण्याची शक्यता असल्याने दोन्ही विभागासाठी ८ मीटर उंचीचे ३७३ तर ९ मीटर उंचीचे ३०० पोल मागवण्यात आले आहेत़ नंदुरबार, नवापुरसह दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आठ सबस्टेशनमध्ये दुरुस्तीची कामे सुरु होती़ विसरवाडी परिसरातही दुरुस्तीचे मोठे काम पूर्ण करण्यात आले आहे़ कंपनीकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर १०० नवीन ट्रान्सफार्मर मागवण्यात आले असून बिघाड झाल्यानंतर बदलण्याची वेळ आल्यास २४ तासाच्या आत बदलून दिले जाणार आहेत़

१ मुख्य सर्कल कार्यालय, शहादा आणि नंदुरबार असे दोन विभाग, ९ उपविभाग आणि या सर्वात ५९ उपकेंद्र असा वीज वितरण कंपनीचा जिल्ह्यातील विस्तार आहे़ पावसाळ्यात होणाऱ्या डॅमेज कंट्रोलसाठी नंदुरबारात कक्ष निर्माण करण्यात आला आहे़ या कक्षातून जिल्ह्यातील विविध भागातील नुकसानीचा आढावा सकाळच्यावेळी घेत दुरुस्त्या करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते़ दिवसभरात वीज वितरण कंपनीचे एक सहायक अभियंता आणि उपअभियंता यांची पथके दर सहा तासांनी दुरुस्त्या सुरु असलेल्या भागात भेटी देऊन वीज कंपनीच्या वायरमन आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना माहिती देत होते़

जिल्ह्यात चक्रीवादळ आले नसले तरी त्याचा प्रभाव होता़ यामुळे झाडे पडून वीज वाहिन्या तुटल्या होत्या़ यातही शेतशिवारातील वीज वाहिन्या तुटण्याचे प्रमाण अधिक होते़ तुटलेल्या तारा दुरुस्त करुन कृषीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ गुरुवारी दुपारनंतर शेतशिवारात वीज पूर्ववत करण्यात आली होती़

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर शहादा आणि नंदुरबार विभागाचा एक संयुक्त कंट्रोल रुम तयार केला होता़ येथून वादळ आणि पावसामुळे झालेल्या दुरुस्ती कामांची माहिती दिली गेली़ अडचणी आल्यावर त्या सोडवण्यासाठी रिस्पॉन्स टीम पाठवण्यात आल्या़ दुर्गम भागात दीड दिवसात सर्व काही सुरळीत सुरु झाले आहे़ पोल बदलून दिले आहेत़-आऱएम़चव्हाण, अधिक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी, नंदुरबाऱ