तळोद्यात पाण्याअभावी उसाचे पिक आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:18 IST2018-10-05T12:18:43+5:302018-10-05T12:18:48+5:30

तळोदा तालुक्याची स्थिती : उसाचा दर्जा खालावण्याचा धोका, पावसाअभावी दुष्काळी स्थिती

Powdered sugarcane wasted due to sugarcane crop | तळोद्यात पाण्याअभावी उसाचे पिक आले धोक्यात

तळोद्यात पाण्याअभावी उसाचे पिक आले धोक्यात

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवासह परिसरात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आह़े परंतु पाण्याअभावी येथील ऊस संकटात सापडता आह़े पाण्याअभावी पुढील ऊसतोड सुरु होईर्पयत हे पिक जगवावे कसे असा प्रश्न येथील ऊस उत्पादकांना पडला आह़े 
तळोदा तालुका जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो़ या वर्षीही तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर ऊस लागवड करण्यात आली आह़े परंतु यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने ऊसाची पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही़ तसेच लघुप्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा नसल्याने कुपनलिकांनाही पाणी नाही़ उलट दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत असल्याने ऊसाला पाणी देणेही शक्य होत नसल्याने उसतोड सुरु होईर्पयत उसाला पाणी द्यावे तरी कसे? असा प्रश्न शेतक:यांना पडला आह़े समजा उसाला पाणी कसेबसे पुरवलेही तरी त्याचे पोषण कसे होणार, उसाचे वजन किती वाढणार, हे प्रश्नही महत्वपूर्ण ठरणार आहेत़ 
ऊसतोडीत संबंधित कारखाने, खांडसरी उसतोड करताना ऊस पाहूनच त्यास प्राधान्य देत असतात़ ही कल्पना शेतक:यांना असल्याने ब:याच शेतक:यांकडून ऊसाचे पिक चारा म्हणून विक्री करण्यास प्राधान्य दिले जात आह़े जेणेकरुन उसाचे बियाणे, मशागत, खते याचाही खर्च निघाला तरी त्यात समाधान मिळणार आह़े दरम्यान जाणकार शेतक:यांकडून सांगण्यात येते आहे की, दरवर्षी भाद्रपद महिन्यात कुपनलिका, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत असत़े परंतु यावर्षी रिमङिाम पाऊसच असल्याने जमिनीत पुरेशा पाण्याची सिंचन झालेले नाही़ तसेच लघुप्रकल्प, बंधारे यांच्यातही जलसाठा नसल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही़ त्यामुळे उसासारखे पिकला अजून चार महिने पाणी देणे अवघड होऊ शकते असे सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Powdered sugarcane wasted due to sugarcane crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.