नवापूरच्या पोल्ट्री व्यावसायिकांना केंद्राकडून वाढीव नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:17+5:302021-04-07T04:31:17+5:30

तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान आहे. यात पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन प्रकारचे नुकसान होत आहे. प्रत्यक्षात कमी ...

Poultry traders in Navapur will get increased compensation from the Center | नवापूरच्या पोल्ट्री व्यावसायिकांना केंद्राकडून वाढीव नुकसानभरपाई मिळणार

नवापूरच्या पोल्ट्री व्यावसायिकांना केंद्राकडून वाढीव नुकसानभरपाई मिळणार

तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान आहे. यात पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन प्रकारचे नुकसान होत आहे. प्रत्यक्षात कमी नुकसानभरपाई, तर अप्रत्यक्ष दीड वर्ष कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प राहणार आहे. यातून पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान करणारा बर्ड फ्लू असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर केंद्र व राज्य सरकाराने वाढत्या महागाईनुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

शासनाकडे प्रस्ताव पाठवला

पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुटपालन शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत दोन कोटी ३१ लाख रुपये प्राप्त झाले असून, १५ फेब्रुवारीपर्यंत कलिंग प्रक्रिया पूर्ण झालेल्या २२ पोल्ट्रीधारकांना ३० टक्केप्रमाणे एक कोटी ५६ लाख १५ हजार ७२० रुपयांची रक्कम देण्यात आल्याची माहिती जिल्हा सहायक पशुवैद्यकीय अधिकारी के. टी. पाटील यांनी दिली आहे. उर्वरित मदतीच्या रकमेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Poultry traders in Navapur will get increased compensation from the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.