संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता; कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:31+5:302021-09-02T05:05:31+5:30

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, सुनील सोनार, ...

Potential third wave vigilance; Dedication of Cardiac Ambulance | संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता; कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता; कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, सुनील सोनार, अभियंता विशाल कांबळे, गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव, प्रीतम धंढोरे, प्रेम सोनार, चेतन वळवी, फारूक मेमन, फरीद मिस्तरी, मोहित राजपूत आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. यामुळे रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावे, यासाठी रुग्णवाहिकेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यांतर्गत जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे, यासाठी धडगाव नगरपंचायतीला १ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदुरबार पालिकेलादेखील दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या.

कोरोनाच्या महामारीत रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत होती. अशावेळी खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून रुग्णांच्या नातेवाइकांची पिळवणूक होत होती. रुग्णवाहिका भेटलीच तर त्यात अत्यावश्यक सोयी-सुविधा नव्हत्या. अशावेळी रस्त्यातच रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे.

रुग्णवाहिकेतील रुग्णास पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्याच्या वेळेस रुग्णवाहिकेसोबत एक डाॅक्टर रुग्णालयापर्यंत पाठवण्यात येईल. मानधन तत्त्वावर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून, सध्या प्रक्रिया सुरू असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.

Web Title: Potential third wave vigilance; Dedication of Cardiac Ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.