कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:48 IST2020-09-05T12:48:25+5:302020-09-05T12:48:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे ...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टस्रिंग ठेऊन आंदोलन केले गेले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकरला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश आहे. त्यात मुल्यांकन पात्र घोषीत, अघोषीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे केवळ घोषीत यादीचा विचार न करता अघोषीत यादीतील शिक्षकांना देखील ते वेतन अनुदान देण्यात यावे. दशकाहून अधीक काळ अर्थात २००२-०३ पासून वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पदमंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे. आयटी विषय शिक्षकांना वेतनश्रेणी वेतन देण्यात यावे. आयटीचे शिक्षक गेल्या १० वर्षाहून अधिक काळ विनावेतन, अत्यल्प वेतनावर कार्यरत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी आयटीचे शिक्षक संबधीत शाळा, महाविद्यालयात अत्यंत मोलाची भुमिका बजावत आहेत. बोर्डाच्या परिक्षेत आॅनलाईनची सर्व कामे हे शिक्षकच करीत आहे. त्यामुळे या विनावेतन, अत्यल्प वेतन असणाºया शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन अनुदान देणे गरजेचे आहे. सर्व शिक्षकांना जुुनी पेन्शन योजना लागू करावीयासह इतर मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.राजेद्र शिंदे, सरचिटणीस प्रा.संजय पाटील, प्रा.बबन बागुल यांच्यासह संघटनेचे शिक्षक उपस्थित होते.